About Us - NavodayaPlus

आमच्याविषयी

नवोदय प्लस: आपल्या मुलांच्या यशाचा विश्वासू सोबती!

नवोदय विद्यालय प्रवेशाचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांसाठी 'नवोदय प्लस' हे हक्काचे व्यासपीठ आहे.

खेड्यापाड्यातील मुलांना शिक्षणासाठी शहरात जावे लागू नये, तर त्यांना घरबसल्या देशातील सर्वोत्तम अशा IIT आणि IIM मधून शिक्षण घेतलेल्या तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळावे, या प्रामाणिक उद्देशाने आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे.

आम्ही केवळ पुस्तकी ज्ञान देत नाही, तर मुलांचा आत्मविश्वास वाढवून त्यांना यशासाठी तयार करतो. आमचे तज्ञ मार्गदर्शक आणि आपली संपूर्ण टीम आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव तत्पर आहे.

आमचे तज्ञ मार्गदर्शक

आमचे सर्व शिक्षक उच्चशिक्षित असून, त्यांना स्पर्धा परीक्षांच्या तयारीचा दांडगा अनुभव आहे.

Prabhakar Gund Sir

प्रभाकर गुंड सर

संस्थापक आणि शिक्षक

"नवोदयचे माजी विद्यार्थी ते नवोदय प्लसचे संस्थापक"

प्रभाकर सर स्वतः जवाहर नवोदय विद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत. त्यांनी मुलांच्या अडचणी जवळून अनुभवल्या आहेत. ते गणित, मानसिक क्षमता आणि मराठी विषयांचे सोप्या भाषेत मार्गदर्शन करतात.

शिक्षण:

  • एम.बी.ए. – आयआयएम, मुंबई
  • बी.टेक. – एनआयटी, नागपूर
  • शालेय – ज.न.वि., सोलापूर
Amit Kumar Sir

अमित कुमार सर

शिक्षक आणि सल्लागार

"गणिताची भीती घालवणारे तज्ञ"

अमित सर IIT Bombay चे माजी विद्यार्थी आहेत. त्यांची शिकवण्याची पद्धत इतकी सोपी आहे की मुलांना गणिताची भीती न वाटता गोडी लागते. ते शैक्षणिक सल्लागार म्हणूनही काम पाहतात.

शिक्षण:

  • एम.टेक. – आयआयटी, मुंबई
  • बी.टेक. – एनआयटी, नागपूर
Padmaksh Gund Sir

पदमाक्ष गुंड सर

तंत्रज्ञान प्रमुख आणि शिक्षक

"तंत्रज्ञान आणि शिक्षणाची सांगड"

पदमाक्ष सरांचे तांत्रिक कौशल्य ॲपला आधुनिक बनवते. IIT Madras मधील शिक्षणाचा उपयोग करत ते मराठी माध्यमातील मुलांना गणित आणि बुद्धिमत्ता विषय आधुनिक पद्धतीने शिकवतात.

शिक्षण:

  • बी.एस. – आयआयटी, मद्रास
  • बी.इ. – सोलापूर युनिव्हर्सिटी

नवोदय प्लसच का निवडावे?

विश्वासार्ह मार्गदर्शन

देशातील नामवंत संस्थांमधून (IIT, IIM, NIT) शिक्षण घेतलेल्या शिक्षकांची टीम.

मातृभाषेतून शिक्षण

कठीण संकल्पना मराठीतून सहज समजतील अशा भाषेत.

एआय (AI) शिक्षक

मुलांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी 24 तास उपलब्ध असलेला आधुनिक 'AI शिक्षक'.

परिपूर्ण तयारी

व्हिडिओ लेक्चर्स, टेस्ट सिरीज आणि मागील 16 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव.

आजच 'नवोदय प्लस' परिवारात सामील व्हा आणि आपल्या मुलांचे नवोदयचे स्वप्न पूर्ण करा!

आत्ताच जॉईन करा